Headlines

शाळा धाकोरे नं. १ मध्ये विद्यार्थ्यांचा आनंददायी प्रवेशोत्सव…

⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची कवाडे १५ जून रोजी खुली झाली .ती विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने. सकाळपासूनच विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांमध्ये सुरू होती. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आजगाव धाकोरे नं. १ या शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी धाकोरे गावच्या सरपंच स्नेहा मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार , पोलीस पाटील श्रीराम प्रभुराळकर उपाध्यक्ष रवींद्र मुळीक, अंगणवाडी सेविका श्रीम. साटेलकर उपस्थित होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा व धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले त्यानंतर मुलांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे व गणवेशाचे वितरण करण्यात आले. सरपंच स्नेहा मुळीक यांनी सर्व मुलांना खाऊचे वाटप केले.
त्यानंतर शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे माजी विद्यार्थी तसेच कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी चे निवृत्त आदर्श शिक्षक श्री वैज सर यांनी मुलांना गोड खाऊ देऊन आपल्या बालपणीच्या आठवणी मुलांना सांगितल्या.
तसेच मंगला प्रभू खानोलकर फाउंडेशन तिरोडा यांच्यामार्फत शाळेतील सर्व मुलांना मोफत एक लिटर स्टीलच्या पाण्याच्या बॉटल सफरचंद व केळी वाटप करण्यात आले .यावेळी फाउंडेशनचे मान्यवर श्री.काकतकर श्री. शेणई उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पुरुषोत्तम शेणई यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रेरणा गोवेकर सहकारी शिक्षिका यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे पदवीधर शिक्षक सोनल जाधव यांनी केले.

You cannot copy content of this page