संजू परब:ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्यानं शिवसेनेकडून निषेध..
⚡सावंतवाडी ता.१६-: आजगाव येथे रात्री पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांत सुसंवाद घडला असून संबंधित कंपनीच्या माणसांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. यात संबंधितांकडून कोणतीही मारहाण न झाल्याचे तसेच त्रास न दिल्याचा जबाब दिला. मात्र, आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, शिवसेना पक्ष तसेच पालकमंत्री नितेश राणे ग्रामस्थांच्या पाठीशी उभे आहेत असा शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला.
श्री. परब म्हणाले, ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा शिवसेना निषेध करत आहे. आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी असून पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. ते देखील ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे अशी माहिती श्री. परब यांनी देत अजामीनपात्र गुन्हे दाखल करणाऱ्यांचा निषेध नोंदवला.
