⚡सावंतवाडी ता.१६-: श्री काळोबा मित्रमंडळाच्या वतीने आजगाव वसवाचे तळे या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
यावेळी श्री काळोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रविण पालव, लक्ष्मण परब,अर्जुन पालव,दत्तात्रय गावडे, प्रकाश परब,दामीनी परब,स्वाती पालव,सिया गावडे,वैशाली धुरी,सानिका परब,अमॄता गावडे,शिक्षक अर्जून रणशूर,अंगणवाडी सेविका देविका गोवेकर,मदतनीस पूजा कोठावळे उपस्थित होते.
शाळेची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंडळाच्यावतीने करण्यात आले.तसेच मंडळाच्या वतीने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही प्रविण पालव यांनी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जुन रणशूर यांनी केले तर आभार प्रविण पालव यांनी मानले .
शाळेसाठी तसेच गावातील वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमी सहकार्य करणाऱ्या श्री देव काळोबा मंडळ व ग्रामपंचायत सदस्य प्रविण पालव यांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.
