ज्ञानदेव मांजरेकर सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त तळवडे नंबर आठ शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप…

⚡सावंतवाडी ता.१६-: १५ जून रोजी शाळा तळवडे नंबर आठ (गडगेवाडी) येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २ मोफत पाठ्यपुस्तक,गणवेश वितरण व दप्तरांचे वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळा पूर्वतयारी मेळाव्यामध्ये प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले तसेच नवीन विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत १००% विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी तळवडे गडगेवाडी येथील मुंबईस्थित ग्रामस्थ सचिन मांजरेकर यांनी आपले बंधू ज्ञानदेव मांजरेकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य तसेच शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप केले.
या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती गीत गावडे,उपाध्यक्ष निलेश मांजरेकर,तळवडे ग्रामपंचायत माजी सरपंच श्रीमती दिपाली मांजरेकर,माजी उपसरपंच बाळू साळगावकर, सचिन मांजरेकर, संदीप मयेकर, विनेश नरवणकर, शरद देवरुखकर,सुधाकर मांजरेकर,शंकर मांजरेकर, बाळू मांजरेकर, कृष्णा मांजरेकर,राजन काष्टे, संजय आचरेकर,अंगणवाडी सेविका श्रीम.मसुरकर,मदतनीस श्रीमती संध्या आसोलकर तसेच सर्व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
व्यासपीठावरील सचिन मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन यापुढेही आपले सहकार्य शाळेला सदोतीत असेच लाभेल असे आश्वासन दिले तसेच तळवडे गडगेवाडी माजी उपसरपंच बाळू साळगावकर यांनीही आपल्या मनोगतात शाळेबद्दल गौरवोद्गार काढून शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ ललित सावळाराम गडेकर यांनी उत्स्फूर्तपणे सावित्रीबाई दत्तक पालक योजनेसाठी ३०००/- रुपये रक्कम देऊन एक मुलगी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.
सर्व कार्यक्रम अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अनिशा कोलगावकर तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सावंत यांनी केले.

You cannot copy content of this page