Headlines

अखेर नितेश राणे निघाले घरी

ओरोस ता.०१-:* आ नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळताच अटक करण्यासाठी व्यूहरचना करणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दहा दिवसांच्या असलेल्या दिलाशामुळे पोलिसांना आ राणे यांना अटक करण्यास कायदेशीर अडचण आली. त्यामुळे सुमारे पाऊण तास चाललेल्या या अटक सापळा नाट्याचा भेद करीत आ राणे अखेर घरी गेले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयात…

Read More

आ नितेश राणे पुन्हा न्यायालय इमारतीत

ओरोस ता.०१-:* आ नितेश राणे पुन्हा न्यायालय इमारतीत जाऊन बसले आहेत. जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्या नंतर आ नितेश राणे वाहनांसह घरी निघालेले असताना पोलिसांनी आपली वाहने समोर लावत त्यांना घेराव घातला होता. यानंतर माजी खा निलेश राणे यांनी तुम्ही कोणत्या नियमात अडविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवस दिलासा दिला आहे. जर तुम्ही अडवत असाल तर…

Read More

आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली…

वातावरण तंग; माजी खासदार निलेश राणे आक्रमक ओरोस ता.०१-:* आ नितेश राणे यांनी गाडी पोलिसांनी अडविली आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्या नंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्या समोर आपल्या गाड्या लावल्या आहेत. यामुळे वातावरण तंग झाले असून माजी खा निलेश राणे आक्रमक बनले आहेत. थांबविण्याचे आदेश दाखवा अशी त्यांनी मागणी केली आहे. भाजप कार्यकर्ते मोठ्या…

Read More

आमदार नितेश राणे यांचा नियमित जमीन देखील नामंजूर…

ओरोस ता १ भाजप आ नितेश राणे यांना न्यायालयाने दणका दिला असून नियमित जामीन अर्ज सुद्धा नामंजूर केला आहे. त्यामुळे या निर्णया विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे त्यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले.

Read More

बालवैज्ञानिक स्पर्धेत शशांक नाबरचे यश

वेंगुर्ला ता.०१-:* मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनास प्रोत्साहन देणे व विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक प्रज्ञेचा शोध घेण्याच्या हेतूने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत कराची शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूल कुडाळचा विद्यार्थी शशांक भूषण नाबर (इयत्ता नववी) हा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तसेच त्याची द्वितीय फेरीत प्रात्यक्षिक…

Read More

प्रोऍक्टिव्ह अॅबकस स्पर्धेत वेतोरे सेंटरचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस स्पर्धेत वेतोरे सेंटरचा कु.गुरुराज शेणवी या विद्यार्थ्याने पश्चिम महाराष्ट्रात तिसरा येण्याचा मान पटकाविला आहे तर याच सेंटरच्या इतर पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अॅबॅकसच्या घेण्यात आलेल्या. यात प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस वेतोरे सेंटरच्या कु.गुरुराज शेणवी या विद्यार्थ्याने पश्चिम महाराष्ट्रात तिसरा येण्याचा मान मिळविला आहे. तसेच वीरा गोगटे, दिव्या…

Read More

वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या वरदविनायक मंदिरात कार्यक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कॅम्प भागातील खत गोदामानजिक असलेल्या संघाच्या मालकीच्या वरदविनायक मंदिरात गणेश जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा व सायं. ७ वा. श्री देव घोडेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ (अणाव) हुमरमळा यांचे दशावतारी नाटक होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. वरदविनायक मंदिराचे…

Read More

विजय पडवळ यांचे गोवा येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

सावंतवाडी ता.०१-:शहरातील सर्वोदयनगर येथील रहिवासी विजय सिताराम पडवळ ( वय ५२, रा. गोवा ) यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. सावंतवाडी बाजारपेठ येथील बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस मधील कर्मचारी अरुण पडवळ यांचे ते बंधू होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

Read More

संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्याप्रकरणी राकेश परब याला 4 दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली ता.०१-:* जिल्हा बँक निवडणूकीतील सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी राकेश परब सोमवारी कणकवली पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली मंगळवारी सकाळी ८ वाजता कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले . यात राकेश परब याला ४ फेब्रुवारीपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली….

Read More

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीवर महाविकास आघाडी पॅनलची बाजी

भाजपा प्रणीत पॅनलचा दारुण पराभव कणकवली ता.०१-:* फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित संकल्प पॅनलने बाजी मारत एज्युकेशन सोसायटी वर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. महाविकास आघाडीचे संकल्प पॅनल विरुद्ध भाजपा प्रणीत विकास पॅनल या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. यात महा विकास आघाडीच्या वज्रमुठीचा फटका भाजपाप्रणीत पॅनल ला बसला. संकल्प पॅनलचे तब्बल 10…

Read More
You cannot copy content of this page