भाजपा प्रणीत पॅनलचा दारुण पराभव
कणकवली ता.०१-:* फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित संकल्प पॅनलने बाजी मारत एज्युकेशन सोसायटी वर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. महाविकास आघाडीचे संकल्प पॅनल विरुद्ध भाजपा प्रणीत विकास पॅनल या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. यात महा विकास आघाडीच्या वज्रमुठीचा फटका भाजपाप्रणीत पॅनल ला बसला. संकल्प पॅनलचे तब्बल 10 उमेदवार विजयी झाले. तर विकास पॅनलचे 5 उमेदवार विजयी झाले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूने प्रतिष्ठा पणाला लागली होती. ही निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावरूनही जोरदार घडामोडी घडल्या होत्या. प्रांताधिकारी कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या इशाऱ्याची देखील निवडणुकीपूर्वी जोरदार चर्चा झाली होती. अशा स्थितीत झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलचे जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे यांचा करिश्मा या निवडणुकीत दिसला.
काल सोमवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालली. व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. पॅनल निहाय विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे: संकल्प पॅनल – पॅनल प्रमुख संजय आंग्रे 541, संदेश सावंत 488, आनंद मर्ये 458, सुभाष सावंत 433, दत्तात्रय पवार 423 रंजन नेरूरकर 411 विठोबा तायशेटे 398, महेश सावंत 394, चंद्रशेखर लिंग्रस 367, रमेश भोगटे 361. विकास पॅनल: राजन चिके 487, सदानंद उर्फ बबन हळदिवे 416, मनीष गांधी 414, अभिनंदन डोर्ले 380, श्रीकांत आपटे 367. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ. श्री. म्हसकर यांनी काम पाहिले.
