मराठा समाजातर्फे असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांचा सत्कार

कणकवली १ फेब्रुवारी (प्रतिनिधी)– असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमनपदी पत्रकार भगवान लोके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कणकवली सकल मराठा समाजातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सकल मराठा समाजातर्फे भगवान लोके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष भाई परब,महेंद्र सांब्रेकर, सुशील सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी,बबलू सावंत,शेखर राणे,पत्रकार भगवान लोके यांच्यासह सकल मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो कणकवली:असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमनपदी पत्रकार भगवान लोके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कणकवली सकल मराठा समाजातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना भाई परब,महेंद्र सांब्रेकर, सुशील सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी,बबलू सावंत,शेखर राणे व अन्य.

You cannot copy content of this page