सावंतवाडी : न्हावेली ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून (रेवटेवाडी, भोमवाडी, विवरवाडी) रिक्त असलेल्या सदस्यपदासाठी चैताली चंद्रकांत दाभोलकर यांनी अर्ज दाखल केला होता. एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
दाभोलकर यांचे सरपंच प्रतिभा गावडे यांच्यासह सदस्य शरद धाऊस्कर, मोहन पालेकर, संतोष फणसेकर, प्रसाद गावडे, भैय्या नाईक, सुशील नागवेकर, दादा हरमलकर, आनंद मसुरकर तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
