आ नितेश राणे पुन्हा न्यायालय इमारतीत

ओरोस ता.०१-:* आ नितेश राणे पुन्हा न्यायालय इमारतीत जाऊन बसले आहेत. जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्या नंतर आ नितेश राणे वाहनांसह घरी निघालेले असताना पोलिसांनी आपली वाहने समोर लावत त्यांना घेराव घातला होता. यानंतर माजी खा निलेश राणे यांनी तुम्ही कोणत्या नियमात अडविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवस दिलासा दिला आहे. जर तुम्ही अडवत असाल तर आदेश दाखवा, अशी मागणी पोलिसांजवळ केली. यावेळी पोलीस निरुत्तर झाले. त्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई व सतीश मानशिंदे पुन्हा नितेश राणे असलेल्या ठिकाणी आले व त्यांना जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पुन्हा घेऊन गेले आहेत.

You cannot copy content of this page