वातावरण तंग; माजी खासदार निलेश राणे आक्रमक
ओरोस ता.०१-:* आ नितेश राणे यांनी गाडी पोलिसांनी अडविली आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्या नंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्या समोर आपल्या गाड्या लावल्या आहेत. यामुळे वातावरण तंग झाले असून माजी खा निलेश राणे आक्रमक बनले आहेत. थांबविण्याचे आदेश दाखवा अशी त्यांनी मागणी केली आहे. भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.
