बालवैज्ञानिक स्पर्धेत शशांक नाबरचे यश

वेंगुर्ला ता.०१-:* मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनास प्रोत्साहन देणे व विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक प्रज्ञेचा शोध घेण्याच्या हेतूने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात येते.

या स्पर्धेत कराची शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूल कुडाळचा विद्यार्थी शशांक भूषण नाबर (इयत्ता नववी) हा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तसेच त्याची द्वितीय फेरीत प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवडही झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page