वेंगुर्ला प्रतिनिधी- राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस स्पर्धेत वेतोरे सेंटरचा कु.गुरुराज शेणवी या विद्यार्थ्याने पश्चिम महाराष्ट्रात तिसरा येण्याचा मान पटकाविला आहे तर याच सेंटरच्या इतर पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अॅबॅकसच्या घेण्यात आलेल्या. यात प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस वेतोरे सेंटरच्या कु.गुरुराज शेणवी या विद्यार्थ्याने पश्चिम महाराष्ट्रात तिसरा येण्याचा मान मिळविला आहे. तसेच वीरा गोगटे, दिव्या मांजरेकर, शर्व आपटे, आर्यन शेणवी, दिशा गोगटे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून वेतोरे सेंटरला बेस्ट अॅवॉर्डही घोषित झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांना वेतोरे सेंटरच्या संचालिका आराध्या गोगटे व गिरीश करडे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ श्री साई योगेश्वरी मंगल कार्यालय वेतोरे येथे केंद्र शाळा वेतोरे नं. १च्या मुख्याध्यापिका प्रियांका बालम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
