वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या वरदविनायक मंदिरात कार्यक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कॅम्प भागातील खत गोदामानजिक असलेल्या संघाच्या मालकीच्या वरदविनायक मंदिरात गणेश जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा व सायं. ७ वा. श्री देव घोडेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ (अणाव) हुमरमळा यांचे दशावतारी नाटक होणार आहे.

तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. वरदविनायक मंदिराचे उर्वरित बांधकाम सुरु असून त्यासाठी कोणाला सहकार्य करावयाचे आहे त्यांनी संघाचे चेअरमन एम.के.गावडे व प्रभारी व्यवस्थापक प्रदिप तेरेखोलकर यांच्याशी संफ साधावा.

You cannot copy content of this page