Headlines

वेंगुर्ला कॅम्प भटवाडी येथे उद्या “कुर्मदासाची वारी” दशावतार नाट्यप्रयोगाचे होणार सादरीकरण…

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला, कॅम्प-भटवाडी येथील श्री शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेच्या भव्य पटांगणावर मंगळवार दि.८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी‘ हा आध्यात्मिक, प्रबोधनयुक्त हृदयस्पर्शी आणि विठ्ठल भक्तीवर आधारीत असा नाट्यप्रयोग होणार आहे. हा नाट्यप्रयोग श्री शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेचे शिक्षक, पालक, ग्रामस्थ, नाट्यप्रेमी, दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने आयोजित…

Read More

आरवली येथे मधुमेह चिकित्सा शिबिर

वेंगुर्ला ता.०७-:* श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व आनंद सेवा प्रतिष्ठान आरवली यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च व २६ मार्च रोजी श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृह येथे मोफत मधुमेह चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दि.१६ मार्च रोजी सकाळी ७.३० वा. रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वा.ते सायंकाळी…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दर्जेदार सुविधा मिळाव्यात

मनसे करणार राज्य सरकारकडे मागणी;तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची माहिती सावंतवाडी ता.०७-:* येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन होत असतात. त्यामुळे हे रुग्णालय सेवा सुविधानी सुसज्ज व्हावे. तसेच या रुग्णालयात दर्जेदार सुविधा मिळाव्यात अशी मागणी राज्य सरकारकडे मनसे तर्फे करणार असल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, रुग्णालयाला सोनोग्राफी…

Read More

ठाकूर गुरुजींना बापूभाई शिरोडकर अष्टावधानी गुरू पुरस्कार वितरण

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने करण्यात आला सन्मान ओरोस ता.०७-:बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘बापूभाई शिरोडकर अष्टावधानी गुरु पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील सुरेश शामराव ठाकूर यांना सेवांगण मालवणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर व उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असे…

Read More

घे भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्या महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर…

नागरिकांनी सहभागी होण्याचे अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचे आव्हान… सावंतवाडी ता.०७-: घे भरारी फाऊंडेशन आणि सारथी फाऊंडेशन, ग्लोबल फाऊंडेशन, YHS फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक ८ मार्च रोजी सावंतवाडी येथील दैवज्ञ गणपती मंदिर येथे नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, व डोळे, नाक, घसा तपासणी यासंदर्भात आरोग्य तपासणी होणार असून, या शिबिराचा बहुसंख्य…

Read More

भटवाडी येथील कूपन घालून रस्ता बंद करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न हाणून पाडू…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा… सावंतवाडी ता.०७-:* येथील भटवाडी परिसरातील गावडेवाडी भागातील गावडे घर ते सुभेदार यांच्या घरापर्यंत असलेली पाणंद तारेचे कुंपण टाकून बंद करण्याचा प्रयत्न काल ठेकेदाराकडून करण्यात आला होता. असा प्रयत्न पुन्हा केल्यास तो हाणून पाडू असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे. सबंधित प्रश्न शांतता न बिघडवता चर्चा करून…

Read More

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत नाबर प्रशालेच्या मधुरा पाटीलचे उल्लेखनीय यश

बांदा ता.०७-:* श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मेडीअम स्कूल, बांदा प्रशालेच्या कु मधुरा जगदिश पाटील (इयत्ता – नववी) हिने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. प्राथमिक फेरीसाठी उत्तीर्ण झाल्यावर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी द्वितीय फेरीसाठी तिची निवड करण्यात आली होती, यामध्ये देखील तिने उल्लेखनीय यश प्राप्त करून तिसऱ्या…

Read More

तंदुरुस्त जीवन हाच दीर्घायुष्याचा मूलमंत्र

नयना सावंत;लायन्सच्या व्यायाम-आहार प्रशिक्षणाला सावंतवाडीत प्रतिसाद सावंतवाडी ता..०७-:* नियमित व्यायाम आणि पोषक आहाराने आपले आरोग्य तंदुरुस्त राहते आणि हाच दीर्घायुष्याचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन सुप्रीमो जिमचे संचालक सौ. नयना वैभव सावंत आणि वैभव सावंत यांनी येथे केले. सर्वोदय नगर येथे नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ओपन जिममधील व्यायाम उपकरणाची शास्त्रोक्त माहिती नागरिकांना देण्यासाठी सावंतवाडी लायन्स क्लबतर्फे…

Read More

वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न अखेर साकार

खास. विनायक राऊत;सावंतवाडीत कृतज्ञता सोहळा उत्साहात *⚡सावंतवाडी,ता.०६-:* ज़िल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याचे सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. यात आलेले अडथळे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच पार करता आले. आता त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारीही आपली सर्वांचीच आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. दरम्यान जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी जेवढे प्रयत्न करण्यात…

Read More

करंजे येथील विविध विकास कामांचा जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील करंजे गावामध्ये केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत तसेच आमदार नितेश राणे यांच्या फंडातून विविध विकास कामांचा शुभारंभ जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत करंजे कुंभारवाडी योजनेची नवीन विहीर करणे, मळयेवाडी नवीन टाकी व पाईपलाईन करणे, बौद्धवाडी विस्तारित पाईपलाईन करणे,नारकरवाडी पाईप लाईन दुरुस्त करणे,…

Read More
You cannot copy content of this page