भटवाडी येथील कूपन घालून रस्ता बंद करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न हाणून पाडू…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा…

सावंतवाडी ता.०७-:* येथील भटवाडी परिसरातील गावडेवाडी भागातील गावडे घर ते सुभेदार यांच्या घरापर्यंत असलेली पाणंद तारेचे कुंपण टाकून बंद करण्याचा प्रयत्न काल ठेकेदाराकडून करण्यात आला होता. असा प्रयत्न पुन्हा केल्यास तो हाणून पाडू असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.

सबंधित प्रश्न शांतता न बिघडवता चर्चा करून सोडवावा असा सल्ला देखील त्यानी यावेळी दिला आहे. या भागातील नागरिकांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, हा त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कुपन घालण्याचा प्रयत्न करून ठेकेदाराने त्याच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला आहे. शहरातील सर्व पाणंद आणि नाल्यांवर दिनांक ३० मार्च २०१७ रोजी निघालेल्या निवेदेतील १७ नंबरच्या मुद्द्यानुसर नगरपरिषद आणि महाराष्ट्र शासन याचा अधिकार असून, त्यावर कोणीही मालकी हक्क सांगू शकत नाही. असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page