डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत नाबर प्रशालेच्या मधुरा पाटीलचे उल्लेखनीय यश

बांदा ता.०७-:* श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मेडीअम स्कूल, बांदा प्रशालेच्या कु मधुरा जगदिश पाटील (इयत्ता – नववी) हिने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.

प्राथमिक फेरीसाठी उत्तीर्ण झाल्यावर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी द्वितीय फेरीसाठी तिची निवड करण्यात आली होती, यामध्ये देखील तिने उल्लेखनीय यश प्राप्त करून तिसऱ्या फेरीसाठी तिची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी यांनी मधुराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page