वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला, कॅम्प-भटवाडी येथील श्री शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेच्या भव्य पटांगणावर मंगळवार दि.८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी‘ हा आध्यात्मिक, प्रबोधनयुक्त हृदयस्पर्शी आणि विठ्ठल भक्तीवर आधारीत असा नाट्यप्रयोग होणार आहे.
हा नाट्यप्रयोग श्री शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेचे शिक्षक, पालक, ग्रामस्थ, नाट्यप्रेमी, दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. तरी यावेळी सर्वांनी उपस्थित राहून या नाट्यप्रयोगाचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे
