बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने करण्यात आला सन्मान
ओरोस ता.०७-:बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘बापूभाई शिरोडकर अष्टावधानी गुरु पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील सुरेश शामराव ठाकूर यांना सेवांगण मालवणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर व उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मिकांत खोबरेकर, सेवांगण कट्टाचे अध्यक्ष किशोर शिरोडकर, प्रसिद्ध कवी रुजारिओ पिंटो, नितीन वाळके, ॲड. देवदत्त परुळेकर, सौ. विणा ठाकूर, बापू तळावडेकर, मंगल परुळेकर, बाबाजी भिसळे, सुजाता पावसकर, वैष्णवी लाड, सेवांगण मालवणचे पदाधिकारी, को.म.सा.प. मालवणचे पदाधिकारी, कट्टा पंचक्रोशी व आचरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
