मनसे करणार राज्य सरकारकडे मागणी;तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची माहिती
सावंतवाडी ता.०७-:* येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन होत असतात. त्यामुळे हे रुग्णालय सेवा सुविधानी सुसज्ज व्हावे. तसेच या रुग्णालयात दर्जेदार सुविधा मिळाव्यात अशी मागणी राज्य सरकारकडे मनसे तर्फे करणार असल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिली आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, रुग्णालयाला सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे. त्यासाठी तंत्रज्ञ व टेक्निशियन उपलब्ध व्हावेत अशी आपण मागणी करणार असल्याचे देखील ते म्हणाले. तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली आज मनसे शिष्टमंडळाने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांची भेट घेऊन, रुग्णालयातील सेवा सुविधांवर आणि अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, शहराध्यक्ष आशिष सुभेदार,अँड.अनिल केसरकर,संतोष भैरवकर,मळगाव शाखा अध्यक्ष राकेश परब उपाध्यक्ष पांडुरंग बुगडे, आदी उपस्थित होते
