करंजे येथील विविध विकास कामांचा जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील करंजे गावामध्ये केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत तसेच आमदार नितेश राणे यांच्या फंडातून विविध विकास कामांचा शुभारंभ जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत करंजे कुंभारवाडी योजनेची नवीन विहीर करणे, मळयेवाडी नवीन टाकी व पाईपलाईन करणे, बौद्धवाडी विस्तारित पाईपलाईन करणे,नारकरवाडी पाईप लाईन दुरुस्त करणे, साटमवाडी विस्तारित पाईपलाईन करणे व चौथऱ्याची दुरुस्ती करणे ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांचा शुभारंभ जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच आम.नितेश राणे यांच्या फंडातून कुंभारवाडी ते नळयोजना विहिरी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, आपटेवाडी प्रकाश भोगले घर ते सार्वजनिक विहिरीपर्यंत व सार्वजनिक विहीर ते गायकवाड घरापर्यंत पायवाट तयार करणे अशी कामे मंजूर करण्यात आली व त्यांचे प्रत्यक्षात काम देखील सुरू करण्यात आलेले आहे. जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती मिलिंद मेस्त्री, पं. स. सदस्य दिव्या पेडणेकर, राजू पेडणेकर, सरपंच मंगेश तळगावकर, उपसरपंच शामसुंदर वर्दम, ग्रा.पं.सदस्य वासुदेव राणे, तृप्ती नारकर, अर्चना घोणे, गणेश तळगावकर, सदानंद सातवसे, विठोबा सातवसे, प्रकाश चिंदरकर, सदानंद चिंदरकर, किशोर खेडेकर, सुरेश घोणे, उत्तम वावळीये, सचिन खेडेकर, देवेंद्र चिंदरकर, एकनाथ चिंदरकर, चंद्रकांत चिंदरकर, आप्पा पुजारे, दादू मळये, पंढरी मळये, बबन मळये, नीलांबर रासम, दामू साटम, दामू सावंत, बबन बरंगे, संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, विजय इंगळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page