रोहिदास चर्मकार संघटनेच्या कोकण विभाग संपर्कप्रमुखपदी सी.आर .चव्हाण

कणकवली ता.०६-:* संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई- महाराष्ट्र या संस्थेच्या कोकण विभाग संपर्कप्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र उर्फ सी . आर . चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांच्याहस्ते सी . आर . चव्हाण यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मसुरकर उपस्थितीत होते.

राज्यसंघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या सहिने दिलेल्या नियुक्ती पत्रात सी . आर . चव्हाण चर्मकार बांधवांसाठी करीत असलेले काम तसेच शैक्षणिक , सामाजिक , कला क्रीडा , राजकिय क्षेत्रामध्ये देत असलेल्या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई- महाराष्ट्र या चर्मकार समाजाच्या सेवाभावी संस्थेची निःस्वार्थीपणे सेवा करण्याची संधी देत असल्याचे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे . या नियुक्तीबद्दल सी . आर . चव्हाण यांचे चर्मकार बांधवांकडून तसेच मित्र परिवाराकडुन अभिनंदन करण्यात येत आहे .

You cannot copy content of this page