कणकवली ता.०६-:* कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या आमदार निधीतून कोळोशी वरची वाडी ब्राह्मण देव रस्ता नुतनीकरण शुभारंभ नुकताच कणकवली उपसभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी कणकवली तालुका भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर,कोळोशी सरपंच रितीका सावंत, सोसायटी चेअरमन संतोष चव्हाण,माजी सरपंच सुशिल इंदप, आयनल सरपंच बापू फाटक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा कुलकर्णी, कणकवली तालुका पत्रकार समिती चे उपाध्यक्ष उत्तम सावंत,छोटू खोत , निवृत्त सुभेदार, विठोबा राणे,बाबा राणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंदू शिंदे,संजय इंदप,विजय इंदप, अनिल इंदप ,समिर मिठबावकर, हेमंत मिठबाकर,बाबू पडवळ, राजेंद्र कदम,सुजय इंदप,बबलू पेडणेकर प्रविण मिठबावकर,दिपक इंदप आदी उपस्थित होते. सदर कामासाठी भाजपचे सरचिटणीस पंढरी वायंगणकर व उत्तम सावंत यांनी पाठपुरावा केला होता.
