मालवण ता.०६-:* कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या पश्चिम महाराष्ट्र शरीर सौष्टव स्पर्धेत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने मालवण येथील द फिटनेस वॉरियर जिमचा व्यायामपटू गणेश हनुमंत सातार्डेकर याने ५५- ६० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावत मिळविलेल्या यशाबद्दल फिटनेस वॉरीयर्स जिम तर्फे गणेश याचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
गणेश सातर्डेकर याने पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेत मिळविलेल्या यशानंतर त्याची महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गणेश याचा फिटनेस वॉरीयर्स जिमतर्फे राजन गावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गणेश पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दुर्गेश गावकर, ललित चव्हाण, पंकज गावडे यांसह जिमचे सर्व सदस्य उपस्थित होते.
