नव्या विद्यार्थी नेतृत्वाने स्वीकारली जबाबदारी….
⚡सावंतवाडी ता.२७-: भोसले नॉलेज सिटी अंतर्गत कार्यरत यशवंतराव भोसले सैनिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी परिषद शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना पदभार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वागतगीत, संचलन, विद्यार्थी प्रतिनिधींचा गौरव व शपथविधी तसेच दहावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रामाणिकपणे, निष्ठेने व समर्पित भावनेने आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांना मानवंदना देण्यात आली.
यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या स्टुडंट्स कौन्सिलचे नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी पुढील प्रमाणे – विक्रांत हाऊस कॅप्टन कॅडेट जिज्ञासा कांबळी व उपकॅप्टन कॅडेट बृंधव कोटला, अर्जुन हाऊस कॅप्टन कॅडेट सर्वेश पांचरणे व उपकॅप्टन कॅडेट गिरिजा चव्हाण, तेजस हाऊस कॅप्टन कॅडेट ओंकार परब व उपकॅप्टन कॅडेट खुशी राठोड, ब्रह्मोस हाऊस कॅप्टन कॅडेट रुद्र खोत व उपकॅप्टन कॅडेट अन्वी पाटील, मेस कॅप्टन कॅडेट विराज बोटे व कॅडेट सुहासी कांबळे, डॉर्म कॅप्टन कॅडेट आराध्य नाटेकर व कॅडेट पूजा चव्हाण, सांस्कृतिक प्रमुख कॅडेट शिवेन विजय व कॅडेट दुर्वा घोडके, स्पोर्ट्स कॅप्टन कॅडेट बसनगौडा कलबुर्गी व कॅडेट आस्था पवार, हेड बॉय कॅडेट रणवित रांजणे व हेड गर्ल कॅडेट पूर्वी माने.
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल स्टुडंट्स कौन्सिल विद्यार्थी प्रतिनिधी पुढील प्रमाणे – (माध्यमिक विभाग) पृथ्वी हाऊस कॅप्टन आदिश गावडे व व्हाईस-कॅप्टन मधुरा धारगळकर, अग्नि हाऊस कॅप्टन अनुराग राणे व व्हाईस-कॅप्टन आरोही परब, जल हाऊस कॅप्टन संकेत राणे व व्हाईस-कॅप्टन जेनिशा पटेल, वायु हाऊस कॅप्टन प्रज्ञेश बर्गे व व्हाईस-कॅप्टन प्रथम पाखरे, सचिव विधी वेटे, सहसचिव अनुष्का गावडे, सांस्कृतिक सचिव वैभवी शेलटकर, सह-सांस्कृतिक सचिव चैतन्य गाडेकर, क्रीडा प्रमुख गौरव वारंग व निष्का नाईक, शिस्त प्रमुख धवनिल सावंत व स्वरा पंडित, हेड बॉय आरुष चव्हाण व हेड गर्ल माही वालावलकर.
(प्राथमिक विभाग) पृथ्वी हाऊस कॅप्टन आर्यन कानसे व उपकॅप्टन विवान पाटील, अग्नि हाऊस कॅप्टन रियान्श हवाल व उपकॅप्टन विघ्नेश अंबापूरकर, जल हाऊस कॅप्टन राज देसाई व उपकॅप्टन ओजस पालकर, वायु हाऊस कॅप्टन धनेश सुराणा व उपकॅप्टन अयान डिसोझा, हेड बॉय आदित्य धारगळकर व हेड गर्ल आरुषी घाडी.
या सोहळ्याला श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल (डॉ.) रत्नेश सिन्हा, वायबीआयटी प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसल, वायबीसीपी प्राचार्य डॉ. विजय जगताप, यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस, इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई तसेच उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
