रेल्वेच्या धडकेने हळवल मध्ये एकाचा मृत्यू
कणकवली 9 मार्च (प्रतिनिधी)- मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसची धडक बसून तालुक्यातील हळवल रेल्वे फाटका जवळ एका 50 वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी 4.30 च्या दरम्यान घडली. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आत्महत्या असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान घटनेच्या माहितीनंतर रेल्वे पोलीस बलाचे गणेश हडके हे घटनास्थळी दाखल झाले….
