अधिकाऱ्यांनी राबविली ‘योजना अडवा, निधी जिरवा’ मोहीम

उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचा गंभीर आरोप;कृषी समितीत पाणलोट प्रकल्पावरून राज्य कृषी विभाग टार्गेट

ओरोस ता.०९-:* जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट प्रकल्प अंतर्गत “पाणी अडवा, पाणी जिरवा” यासाठी केंद्र शासनाने २५० कोटी रुपये दिले. परंतु त्यातून बंधारे उभारल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत नाहीत. अधिकाऱ्यांनी या योजनेतून ‘योजना अडवा, निधी जिरवा’ ही आपली योजना राबविली आहे, असा गंभीर आरोप कृषी समितीच्या सभेत सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी राज्य कृषी विभागावर केला आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा बॅ नाथ पै सभागृहात श्री म्हापसेकर सांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस एन म्हेत्रे, सदस्य सुधीर नकाशे, अमरसेन सावंत, अनुप्रीती खोचरे, प्रितेश राऊळ, गणेश राणे, सावी लोके आदी उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत एकात्मिक पाणलोट प्रकल्प विषय चांगलाच गाजला. राज्य कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर यावेळी उपाध्यक्ष म्हापसेकर, सुधीर नकाशे, अमरसेन सावंत, गणेश राणे, प्रितेश राऊळ यांनी जोरदार आरोप करीत शासनाच्या पैशांचा अपव्यय केल्याचा ठपका ठेवला.

You cannot copy content of this page