कणकवली, ९ मार्च (प्रतिनिधी)-कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, लोरे, हरकुळ, वाघेरी या परिसरात दुपारच्या दरम्यान अचानक जोरदार वारा सुरू होऊन गारांसहित तुफान अवकाळी पाऊस पडला. दरम्यान आज सकाळ पासूनच फार मोठा उष्मा जाणवत असताना अचानक दुपारी ३.०० वा. च्या
दरम्यान या परिसरात जोरदार वारे वाहू लागल्यानंतर काही वेळातच मोठमोठ्या गारांसाहित तुफान पाऊस सुरू झाला .अचानक आलेल्या या पावसाने सर्वांची दाणादाण उडवून दिली बाहेर लावलेली रस्त्यावरील दुकानदारांची पळापळ झाली तर गृहिणींनी बाहेर वाळत घातलेले कपडे व अन्य सुकत घातलेले हंगामी पदार्थ वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली.मात्र अचानक आलेल्या या अर्धा तासाच्या पावसाने वातावरणात थोडा थंडावा निर्माण झाला आहे.
