सावंतवाडी बाजारपेठेत चारचाकी आणि दुचाकी मध्ये अपघात…
*⚡सावंतवाडी ता.०९-:* सावंतवाडी येथे इंदिरा गांधी चौक येथे एका चारचाकिने दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली असून, या अपघातात दुचाकी चालक जख्मी झाला आहे.
*⚡सावंतवाडी ता.०९-:* सावंतवाडी येथे इंदिरा गांधी चौक येथे एका चारचाकिने दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली असून, या अपघातात दुचाकी चालक जख्मी झाला आहे.
गडकिल्ले संवर्धनाच्या कामाला गती देण्याची सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही सिंधुदुर्ग दि.०९-:* राज्यातील काही गडकिल्ले राज्य शासनाने दुरुस्तीसाठी प्रायोगिक तत्वावर घेतले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग , विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. परंतु सीएसआर फंड, राज्याच्या पर्यटन विभागाचा फंड, आमदार फंड, किंवा नियोजन विभागाचा फंड यापैकी कोणताही फंड भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची परवानगी नसल्याने किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च…
मडुरा, रोणापाल गावात पाच दिवसीय अभ्यास दौरा सुरु बांदा ता.०९-:* बांद्रा – मुंबई येथील एल. एस. रहेजा स्कूल अॉफ आर्किटेक्चरचे सुमारे ८० विद्यार्थी प्रात्यक्षिक शिक्षणासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. सध्या मडुरा व रोणापाल गावात अभ्यास दौरा सुरु आहे. या पाच दिवसीय शिबीरात गावातील पुरातन मंदिरे, मंदिरांची रचना, गावाची संस्कृती, राहणीमान याचा अभ्यास करुन त्यासंदर्भात पुस्तक…
दोन परप्रांतीय कामगार जख्मी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल *⚡सावंतवाडी ता.०९-:* डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी स्वराची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून, अपघात घडला आहे. या अपघातात दोघे परप्रांतीय कामगार जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मनसेची मागणी; उद्घाटन होऊन देखील अद्याप वाचनालय लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध नाही… दोडामार्ग ता.०९ सुमित दळवी-: कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील सुरु केलेल्या वाचनालयाचे उद्घाटन होऊन अजूनपर्यंत वाचनालय लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेले नाही. येत्या दहा दिवसांत वाचनालय लोकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात यावे. तसेच वाचनालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण…
कणकवली ता.०९-:* कणकवली तालुक्यातील कलमठ-लांजेवाडी येथे गणेश मंदिर नजीक कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने हायमास्ट दिवा बसविण्यात आला त्याचा नुकताच लोकार्पण सोहळा पंचायत समिती कणकवली उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते आणि कलमठ पं. स. सदस्य महेश लाड यांच्या खास उपस्थितीतीत श्रीफळ वाढवून संपन्न झाला. तसेच कलमठ सुपुत्र मिलिंद मेस्त्री यांची पंचायत समिती कणकवली उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल समिती…
वेंगुर्ला ता.०९-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयाने पर्यावरणावर आधारित घेतलेल्या पथनाट्य स्पर्धेत अणसूरपाल हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकाविला. या पथनाट्य स्पर्धेत ऋतुजा आमडोसकर, वैष्णवी गावडे, शिवांगी अणसूरकर, पायल गावडे, तनिषा गावडे, भौतिका गावडे, अर्पिता कोरगांवकर, सिद्धी परब या नववीतील विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. यांना स्वाती देऊलकर हिचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थीनींचे अभिनंदन करण्यात आले…
असलदे ग्रामपंचायत आयोजित महिला दिनानिमित्त स्पर्धांच्या विजेत्यांचा गौरव कणकवली ता.०९-:* असलदे गावात ३६ बचतगट आहेत, महिलांना संघटीत केलं जातं आहे.ही चांगली गोष्ट आहे.असलदे ग्रामपंचायतने महिला दिनानिमित्त चांगले कार्यक्रम आयोजित केले,त्याबद्दल सरपंच पंढरी वायगंणकर यांचे कौतुक आहे.असलदे गावाचे दिविजा वृद्धाश्रमाने नावलौकिक वाढवले आहे.त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ध्येय निश्चित केले,तरच यश निश्चित आहे, असे प्रतिपादन…
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे प्रतिपादन कणकवली ता.०९-:* तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष…
कणकवली ता.०९-:* कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींने जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार महिला दिनाचे औचित्य साधून कासार्डे माध्यमिक विद्यालयात स्वसंरक्षण अतंर्गत ज्यूदो-कराटे,लाठी-काठी, या सारख्या अनेक मार्शल आर्टची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी व योगा,रोपस्किपिंगच्या बहारदार सादरीकरणासह विद्यालयातील खास मुलींसाठी १००मीटर धावणे, संगीत खुर्ची स्पर्धा,पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,…