कणकवली ता.०९-:* कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींने जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार महिला दिनाचे औचित्य साधून कासार्डे माध्यमिक विद्यालयात स्वसंरक्षण अतंर्गत ज्यूदो-कराटे,लाठी-काठी,
या सारख्या अनेक मार्शल आर्टची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी व योगा,रोपस्किपिंगच्या बहारदार सादरीकरणासह विद्यालयातील खास मुलींसाठी १००मीटर धावणे, संगीत खुर्ची स्पर्धा,पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा,गीत गायन स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करुन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. ज्यूदो कराटे प्रात्यक्षिकामध्ये कु. स्वप्नाली कदम,कु. सानिका मारकड, कु.श्रुती वरुणकर,कु.शिल्पा शेगावे,कु.पुर्वा धुरी,कु.ममता पाटील,ज्यूदो प्रशिक्षक सोनु जाधव यांचा समावेश होता.तर लाठी काठीचे प्रात्यक्षिक कु. स्वप्नाली कदम हीने बहारदारपणे सादर केले.
योगा मध्ये कु.रिया नकाशे कु. सानिका मत्तलवार व कु.नेहा पाताडे यांनी अतिशय मनमोहक योगा प्रात्यक्षिके सादर केली.तसेच रोपस्किपींगचे सादरीकरण कु.श्रुती वरुणकर,कु.सानिका मारकड कु.नेहा पाताडे कु.शिल्पा शेगावे यांनी केले.सर्व प्रात्यक्षिके विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक श्री यशवंत परब, कु.प्रियंका सुतार , श्री.ऋषिकेश खटावकर, श्री.नवनाथ काणकेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर झाली. तर सर्व स्पर्धा विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांना मार्गदर्शनाखाली पार पडल्या. याप्रसंगी संस्था पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
