डॉ सोनाली तेली यांचा महिला दिनी सत्कार

मानवी हक्क राजदूत संघटनेची सामाजिक बांधिलकी

देवगड आंतरराष्ट्रीय मानवी हक्क राजदूत संघटना शाखा देवगड तालुक्याच्यावतीने जागतिक महिला महिला दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील मोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली तुकाराम तेली यांचा संघटनेच्या देवगड तालुका महिलाध्यक्षा सौ.दीक्षा तेली यांच्या हस्ते शाल-श्रीफळ गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या सुकन्या डॉ.सोनाली तुकाराम तेली यांनी वैद्यकीय क्षेत्रात परदेशात रशियामधून एमबीबीएस म्हणून उच्चशिक्षण घेऊन पुन्हा मायदेशी देवगड ग्रामीण रुग्णालयात त्यांनी कोरोना काळात रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा केली.डॉ.सोनाली तेली यांनी रशियामध्ये ६ वर्षे, दिल्लीमध्ये २ वर्षे वैद्यकीय शिक्षण घेतले.व त्या नंतर त्या ग्रामीण रुग्णालय देवगड येथे काही काळ वैद्यकीय सेवा दिली .त्या नंतर त्या जि. प.आरोग्य विभाग प्रशासनात मोंड प्रा. आरोग्य केंद्र येथे रुजू झाल्या .व ग्रामीण भागातील रुग्णाची सेवा करीत आहेत.या कार्याची दखल घेऊन त्यांचा जागतिक महिला दिनी यथोचित सन्मान करण्यात आल्याचे दयानंद मांगले यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.सोहळ्याचे प्रास्तविक अध्यक्ष दयानंद तेली यांनी केले .

डॉ तेली त्यांचे वडील तुकाराम तेली हे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्याच्या मातोश्री सौ.शुभांगी तेली या अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गटामध्ये सक्रिय आहेत.घरचे वातावरण सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित असल्यामुळे डॉ.सोनाली तेली यांना आपण वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत राहून आपल्या लोकांची सेवा करायची या चांगल्या उदेशाने त्यांनी आपल्या मातृभूमीत देवगड ग्रामीण रुग्णालयात त्यांनी आपल्या सेवेची सुरवात केली.त्यानंतर प्रा. आ. केंद्र मोंड येथे रुजू झाल्या.कोरोना काळात तर त्यांनी कोरोना योध्याचे काम करून लोकांना चांगली सुविधा दिली.

तसेच त्यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय न करता शासकीय सेवेत प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या.त्यामुळे त्यांचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा मोंड याठिकाणी यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे देवगड तालुकाध्यक्ष दयानंद तेली,महिला तालुकाध्यक्ष सौ.दीक्षा तेली,उपाध्यक्ष सौ.शुभांगी तेली, तालुका शिक्षण विभाग अध्यक्ष तुकाराम तेली,मीडिया प्रेसिडेंट दयानंद मांगले, महिला सदस्यासौ.दीपिका मेस्त्री,सदस्य ,कौस्तुभ काळे आ वैद्यकीय अधिकारी जयंत जाधव,परिचारिका गंगूताई अडुळकर, कृषी पराडकर,रवींद्र परब,संजय पावरा,संगीता गावित,प्रणाली राणे,श्री तांबे उपस्थित होते.

You cannot copy content of this page