स्मिता नाईक ठरल्या होम मिनिस्टर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी ता.०९-:* महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधला आहे.त्यांच्या आर्थिक विकासाला जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करणार असुन जिल्ह्यातील प्रत्येक महीला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांनी यांनी ओरोस येथे केले.

८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने येथील अध्यापक पतपेढी सभागृहात होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. या होम मिनिस्टर स्पर्धेतील पहिले बक्षिस सोन्याची नथ पटकवण्या बहूमान स्मिता नाईक यांना मिळाला तर दुसरे बक्षिस पैठणी श्रुती मोर्ये यांनी जिंकली तर तिसरे बक्षिस प्रेशर कुकर चेतना सावंत यांना मिळाले तर उत्तेजनार्थ बक्षिस चौथे व पाचवेअनुक्रमे वैशाली ठाकुर संजना अजगांवकर यांना देण्यात आले.

बक्षिस वितरण जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे निवेदन संदेश तांबे यांनी करत महिलांचे मनोरंजन केले महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा बँकेच्या वतीने जि.प.अध्यक्षा संजना सावंत याना सर्वोकृष्ट राष्ट्रीय महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला मेळाव्यात जिल्हा बँकेच्यावतीने बँक संचालिका नीता राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वेंगुर्ला तालुक्यातील वेतुरे येतील कर्णबधिर पूजा रुपाजी धुरी हिचा सत्कार करून दहा हजाराची मदत देण्यात आली. तसेच शिक्षणासाठी कर्ज देण्याचेही आश्वासन तीला यावेळी देण्यात आले.

You cannot copy content of this page