पथनाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला ता.०९-:* जागतिक महिला दिना निमित्ताने बॅ.खर्डेकर महाविद्यालय आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पटनाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाने यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकवला.

‘महिला आणि पर्यावरण‘ या विषयावर हे पटनाट्य सादर करताना कृपा, साक्षी, प्रतीक्षा, ऋचा, रुचिरा, जान्हवी, आर्या, अनुष्का आणि संस्कृती या मुलींनी यात सहभाग घेतला होतो. या विद्यार्थीनींना वर्षा मोहिते, उल्का वाळवेकर, कुबल, वैभव खानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थीनींसह मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर, सचिव रमेश नरसुले यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page