कणकवली ता.०९-:* लावण्यसिंधु लोककला व चित्रपट सहकारी संस्थेतर्फे गतवर्षी प्रमाणे यावर्षी जागतिक महिला दिन कार्यक्रमांचे आयोजन येत्या शनिवार 12 मार्च 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री.भवानी सभागृह,तेलीआळी, कणकवली येथे आयोजित करणेत आला
असून यावेळी सांस्कृतिक क्षेत्रातील महिला व मुलीनी उपस्थित रहावे असे आवाहन लावण्यसिंधु चित्रपट संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर,संचालिका सौ. अक्षता कांबळी व सौ. प्रांजल पराडकर यांनी केले आहे. सदरील कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक व कला क्षेत्रातील योगदान देणाऱ्या सौ. गौरी नितीन बांदेकर,सावंतवाडी, भावना गुरुदास प्रभू, कूडाळ,रश्मी मधुसूदन सोगम,कणकवली तसेच कु.आर्या किशोर कदम ,कलमठ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत येणार आहेत.
