कळसुलकर हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन
सावंतवाडी ता.०९-:* आव्हानांचा सामना केला तरच जीवनात यशस्वी व्हाल, प्रत्येकाने वाचन केलेच पाहिजे,वाचन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका माधुरी शानभाग यांनी केले.
प्रशालेतील मराठी विभाग व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कळसुलकर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेतील बालवाडी, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग तसेच उच्च माध्यमिक विभागातील महिला शिक्षिकांना तुळस रोपे देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सुनंदा कामत, माजी शिक्षिका पद्मा फातर्पेकर, प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी मीना खानोलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, ज्येष्ठ शिक्षिका व्ही. जी. चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. वैज, एस. व्ही. भुरे, यु. आर. पाटील, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रसाद नार्वेकर, संचालिका राजश्री टिपणीस, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर हिने भरतनाट्यम मधून गणेश वंदना सादर केली. पाहुण्यांचा परिचय प्रशालेतील शिक्षिका श्रीमती एम. एम. कदम यांनी करून दिला. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, सूत्रसंचालन अनिल ठाकूर यांनी तर आभार मराठी विभागप्रमुख श्रीमती व्ही.जी. चव्हाण यांनी मानले. संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस यांचे कार्यक्रमासाठी बहुमोल सहकार्य लाभले.
