पथनाट्य स्पर्धेत अणसूरपाल द्वितीय

वेंगुर्ला ता.०९-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयाने पर्यावरणावर आधारित घेतलेल्या पथनाट्य स्पर्धेत अणसूरपाल हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकाविला.

या पथनाट्य स्पर्धेत ऋतुजा आमडोसकर, वैष्णवी गावडे, शिवांगी अणसूरकर, पायल गावडे, तनिषा गावडे, भौतिका गावडे, अर्पिता कोरगांवकर, सिद्धी परब या नववीतील विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. यांना स्वाती देऊलकर हिचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थीनींचे अभिनंदन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page