कणकवली ता.०९-:* कणकवली तालुक्यातील कलमठ-लांजेवाडी येथे गणेश मंदिर नजीक कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने हायमास्ट दिवा बसविण्यात आला त्याचा नुकताच लोकार्पण सोहळा पंचायत समिती कणकवली उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते आणि कलमठ पं. स. सदस्य महेश लाड यांच्या खास उपस्थितीतीत श्रीफळ वाढवून संपन्न झाला.
तसेच कलमठ सुपुत्र मिलिंद मेस्त्री यांची पंचायत समिती कणकवली उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल समिती अध्यक्ष , पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन बांदिवडेकर , उत्सव समिती अध्यक्ष महेश परब , उत्सव समिती खजिनदार संतोष बांदिवडेकर , कलमठ युवा नेतृत्व तथा ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री , संदिप पाष्टे , विजय परब , प्रशांत बाणे , दत्ताराम पाष्टे , श्री . नाना चिंदरकर , गणेश सावंत ,रोशन परब , विनोद चव्हाण , स्वप्नील चिंदरकर , प्रेमकुमार बांदिवडेकर , राजा पाष्टे ,भाई मर्तल ,प्रफुल्ल बाणे , बालगोपाळ , ग्रामस्थ आदी उपस्थित होते .
