दोडामार्ग येथील वाचनालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या…

मनसेची मागणी; उद्घाटन होऊन देखील अद्याप वाचनालय लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध नाही…

दोडामार्ग ता.०९ सुमित दळवी-: कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील सुरु केलेल्या वाचनालयाचे उद्घाटन होऊन अजूनपर्यंत वाचनालय लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेले नाही. येत्या दहा दिवसांत वाचनालय लोकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात यावे. तसेच वाचनालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कसई दोडामार्ग नगरपंचायत मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

येत्या दहा दिवसांत वाचनालय लोकांच्या सेवेस उपलब्ध न झाल्यास नगर पंचायत कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा. शहर अध्यक्ष पांडूरंग उर्फ अभिजित खांबल, मनसे उपतालुका अध्यक्ष संदिप गवस, मधुसुदन खांबल, मोतीराम वरक, पांडूरंग जाधव आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page