लोकशाहीच्या चार पैकी दोनच आधारस्तंभावर विश्वास-एम.के.गावडे
वेंगुर्ला ता.१४-:* पुरस्कारातून प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र घडते. लोकशाहीच्या चार आधारस्तंभापैकी पत्रकार व न्यायालय या दोनच आधारस्तंभावर आज लोकांचा विश्वास राहिला आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारीतेची धार बोथट होवू देवू नये असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध विकास संस्थेचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी केले. वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा, मान्यवरांचे सत्कार व बक्षिस वितरण असा…
