मालवण ता.१४-:* कोरोना काळात बंद असलेल्या लोककला कलाकाराना शासनाने अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कलाकारांनी एकल कलाकार योजने साठी अर्ज केले आहेत, त्या काही कलाकारांच्या अर्जात त्रुटी राहिल्या असल्याने त्यांनी आपल्या तालुक्यातील निवड समितीच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकल कलाकार योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी अर्ज केले आहेत त्या अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्याने अश्या लाभार्थींचे अर्ज ग्राह्य मानता येणार नाहीत.
त्यामुळे अनेक वर्षे कार्यरत असुनही काही कलाकार लाभापासुन वंचीत राहणार आहेत. शिवाय काही कलाकारांनी वर्तमान पत्राद्वारे बातमी प्रसिद्ध करून सुद्धा त्याची दखल न घेतल्याने त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. जिल्हाधिकारी यांच्या समवेत निवड समितीची बैठक झाली त्यात राहिलेल्या त्रुटी व कलाकार या बाबतीत फेर विचार करण्याची मागणी निवड समितीने केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कलाकारांना याचा लाभ मिळू शकेल. त्यामुळे अशा कलाकारांनी मालवण तालुका दशावतार निवड समिती सदस्य सुहास माळकर (9404753392) व भजनी कलाकार साठी भजनसम्राट भालचंद्र केळुसकर (9422964132) यांच्याशी संपर्क कराव, तसेच तालुक्यातील कलाकारांनी संबधित प्रतिनिधीशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
