Headlines

दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगावातील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप…

⚡सावंतवाडी, ता.२७-: महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी माजगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ६ (कुंभारवाडा) तसेच गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सायली राऊळ, शिक्षिका सुषमा आईर, अंगणवाडी सेविका श्रावणी हरमलकर, मदतनीस संगीता भोगण, एकनाथ हळदणकर तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page