आमदार केसरकर यांच्या माध्यमातून कलंबिस्तला क्रीडा साहित्याचे वाटप

सावंतवाडी ता.१४-:* आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सह्याद्री कला क्रीडा मंडळ कलंबिस्त कदमवाडी यांना 1 लाखाच्या क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. ह्या क्रीडा साहित्याचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया कलंबिस्तकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी साहित्य मिळवून दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने केसरकर यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शाम कलंबिस्तकर, सचिव संजय पालकर , सदस्य दिपक कदम, राजेश कदम, अनिल कदम, सचिन कदम, बाळकृष्ण कदम, नंदू कदम, अमित कदम ,गोविंद कदम, सुहास कदम याने उपस्थित होते ह्या क्रिडा साहित्याचा गावातील सर्व तरुण वर्गाने योग्य तो लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले

You cannot copy content of this page