कुडाळ,ता.१४-:* युवा रक्ताचा संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा सिंधुदुर्ग रेडिओलाॅजी व रेडिओ डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून शाल, श्रीफळ, रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. संस्थापक कै. डाॅ नंदन सामंत यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात श्री. सूर्याजी यांना गौरविण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून श्री. सूर्याजी व त्यांचा ग्रुप काम करीत आहे. हजारो रुग्णांना रक्त दान करुन त्यांनी जिवदान दिले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदाता फौज निर्माण केली आहे. कोरोना काळात युवा रक्तदाता संघटनेने जे कार्य केले ते सिंधुदुर्ग वासिय कधीच विसरू शकत नाहीत. याच कार्याची दखल घेऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला.
