वेंगुर्ला ता.१४-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वेंगुर्ला तालुका आयोजित अथायू मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, ओझोन मेडीकेअर सर्व्हीसेस व जिल्हा रुग्णालय सिधुदुर्ग यांच्या सहकार्याने १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यात डॉ.राहूल चौगुले, डॉ.ओंकार दळवी, डॉ.स्वप्नाली पवार व डॉ.गृहिता राव आदी तज्ज्ञ डॉक्टर हृदयरोग, किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी, मेंदू व मणका विकास, जनरल तपासणी, महिलांशी संबंधी आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच मोफत ईसीजी व रक्तातील साखर तपासणीही केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचवा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे केले आहे.
