वेंगुर्ला ता.१४-:* सुंदरभाटले येथील श्रीदेव वांद्रेश्वर देवस्थानाचा वार्षिक उत्सव फाल्गुन शु. १३, बुधवार दि.१६ मार्च २०२२ रोजी भक्तिभावाने साजरा होणार आहे.
यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच रात्रौ ९ वा. पार्सेकर दशावतारी मंडळाचा ‘‘पृथ्वी शापित पार्वती‘‘ हा विशेष नाट्यप्रयोग होणार आहे. तरी तिर्थप्रसादाचा लाभ व नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्रीदेव वांद्रेश्वर कला-क्रीडा मंडळ (वांद्रा) यांच्यातर्फे केले आहे.
