कबुलागतदार गावकर जमीन प्रकरणी उद्या प्रांत कार्यालय समोर करणार धरणे आंदोलन…

आंबोली, ता.१४:आंबोली कबुलागतदार गावकर जमीन प्रश्नी उद्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत ठरले.

आंबोली माऊली मंदिर येथे आज गावकऱ्यांची बैठक झाली यात प्रमुख गावकर शशिकांत गावडे,श्रीकांत गावडे,उल्हास गावडे,विलास गावडे,प्रकाश गावडे,सरपंच गजानन पालेकर रामचन्द्र गावडे वैगेरे आदि उपस्थित होते.यावेळी गावात दवंडी देण्यात येणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

वन जमीन आणि खाजगी वने काढून टाकण्यात यावे.यासंबंधी सविस्तर माहिती वन च्या वरिष्ठ पातळीवर बैठक करून महसूल जमीन आणि वन जमीन एकत्रित मूळ जमीन वरचे काबुलयातदर नोंदणी काढून प्रश्न सोडवून जमीन वाटप व्हावे. यासाठी विधिमंडळाने कार्यवाही करावी.यासंबंधीचा निर्णय सरकारने घ्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page