मालवणात महिलांसाठी क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
मालवण ता.१५-:* मालवणमधील क्रिकेटला एक संस्कृती लाभलेली असतानाच आता मालवण मधील महिला देखील क्रिकेटचे मैदान गाजवण्यास सज्ज झाल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला डंका पिटत असताना मालवण मधील महिलांनी देखील प्रेरणा घेत स्वतःतील खिलाडू वृत्ती जपण्यासाठी आणि क्रिकेटच्या खेळात आपले कौशल्य दाखविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून क्रिकेटप्रेमी महिलांनी एकत्र येत महिलांसाठी क्रिकेट…
