कबुलागतदार गावकर जमीन प्रकरणी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू

सावंतवाडी ता.१५-:* आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन संदर्भातील वन आणि महसूल चा अहवाल १४ मार्च पर्यंत तयार न झाल्याने ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन पुकारले असून, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

यावेळी कबुलायतदार गावकर जमीन भोगवटदार वर्ग १ म्हणून वाटपाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, कोणतीही चौकशी न करता करण्यात आलेल्या खाजगी वने, राखीव वने या नोंदी तत्काळ कमी करण्यात याव्यात, आमच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा मागण्या केल्या आहेत.

You cannot copy content of this page