कबुलायतदार गावकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा पाठिंबा

सावंतवाडी ता.१५-:* आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन संदर्भातील वन आणि महसूल चा अहवाल १४ मार्च पर्यंत तयार न झाल्याने ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन पुकारले असून, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. या आंदोलनातून तेथील ग्रामस्थांनी विविध मागण्या केल्या असून, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी या आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

You cannot copy content of this page