आंतरज़िल्हा स्पर्धेत केली शतकी खेळी
सावंतवाडी ता.१५-:* पुणे येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये एम् क्रिकेट अकॅडमीचा सागर प्रसाद सावंत याने नंदुरबार विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात १२१ चेंडूत १५९ धावा ठोकल्या. त्यात १२ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर सिंधुदुर्गने ८ बाद ४१९ धावा पहिल्या दिवशी केल्या.
सागरच्या या शतकी खेळीचे अभिनंदन अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक व उपाध्यक्ष अक्रम खान यांनी केले व पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
