मळगाव आजगावकरवाडी येथील स्मशानभूमीची लोकवर्गणीतून डागडूजी

इच्छुकांनी वर्गणी स्वरूपात मदत करण्याचे आवाहन

सावंतवाडी ता.१५– :* मळगाव येथील आजगावकरवाडी, कुडववाडी, पाडगावकरवाडी व देऊलवाडीसाठी असणाऱ्या स्मशानभूमीची डागडूजी लोकवर्गणीतून व श्रमदानातून करण्यात येत आहे. वरील वाडींसाठी असणाऱ्या स्मशानभूमी परिसरात वाढलेली झाडी श्रमदानातून तोडण्यात आली.

अंत्यविधी ठिकाणी जांभा दगडाने बांधकाम तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांसाठी बैठक व्यवस्था करण्याचे कामही हाती घेण्यात आली आहे. या संपूर्ण कामाला अंदाजे ४० हजार खर्च अपेक्षित आहे. लोकवर्गणीतून हे काम करण्यात येत असल्याने इच्छुकांनी वर्गणी स्वरूपात मदत करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page